Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

जयजयाजी सुखधामा । जयजयाजी परब्रह्मा ।

जयजय भक्तजन विश्रामा । अनंतवेषा अनंता ॥१॥

तुझ्याच कृपे करोन । अल्प वर्णिले स्वामीचरित्र ।

पुढे कथा सुरस अत्यंत । वदविता तूं दयाळ ॥२॥

मागील अध्यायाचे अंती । विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांप्रती ।

चमत्कार दाविती यती । ते चरित्र वर्णिले ॥३॥

अक्कलकोटी वास केला । जन लाविले भजनाला ।

आनंद होतसे सकला । वैकुंठासम नगरी ते ॥४॥

राजे निजाम सरकार । त्यांचे पदरी दप्तरदार ।

राजे रायबहाद्दूर । शंकरराव नामक ॥५॥

सहा लक्षांची जहागीर त्याप्रती । सकल सुखे अनुकूल असती ।

विपुल संपत्ती संतती । काही कमती असेना ॥६॥

परी पूर्वकर्म अगाध । तया लागला ब्रह्मसमंध ।

उपाय केले नानाविध । परी बाधा न सोडी ॥७॥

समंध बाधा म्हणोन । चैन न पडे रात्रंदिन ।

गेले शरीर सुकोन । गोड न लागे अन्नपाणी ॥८॥

नावडे भोगविलास । सुखोपभोग कैचा त्यास ।

निद्रा न येचि रात्रंदिवस । चिंतानले पोळले ॥९॥

केली कित्येक अनुष्ठाने । तशीच ब्राह्मण संतर्पणे ।

बहुसाल दिधली दाने । आरोग्य व्हावे म्हणोनी ॥१०॥

विटले संसारसौख्यासी । त्रासले या भवयात्रेसी ।

कृष्णवर्ण आला शरीरासी । रात्रंदिन चैन नसे ॥११॥

विधीने लेख भाली लिहिला । तो न चुके कवणाला ।

तदनुसार प्राणिमात्राला । भोगणे प्राप्त असे की ॥१२॥

कोणालागी जावे शरण । मजवरी कृपा करील कोण ।

सोडवील व्याधीपासोन । ऐसा कोण समर्थ ॥१३॥

मग केला एक विचार । प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर ।

तेथे जाऊनि अहोरात्र । दत्तसेवा करावी ॥१४॥

ऐसा विचार करोनी । तात्काळ आले त्या स्थानी ।

स्वतः बैसले अनुष्ठानी । व्याधी दूर व्हावया ॥१५॥

सेवा केली बहुवस । ऐसे लोटले तीन मास ।

एके रात्री तयास । स्वप्नी दृष्टांत जाहला ॥१६॥

अक्कलकोटी जावे तुवा । तेथे करावी स्वामीसेवा ।

यतिवचनी भाव धरावा । तेणे व्याधी जाय दूरी ॥१७॥

शंकररावांची भक्ती । स्वामीचरणी काही नव्हती ।

म्हणोनी दृष्टांतावरती । गाणगापूर न सोडिले ॥१८॥

ते तेथेचि राहिले । आणखी अनुष्ठान आरंभिले ।

पुन्हा तयांसी स्वप्नी पडले । अक्कलकोटी जावे तुवा ॥१९॥

हे जाणोनि हितगोष्टी । मानसी विचारुनि शेवटी ।

त्वरित आले अक्कलकोटी । प्रियपत्नीसहित ॥२०॥

अक्कलकोट नगरात । शंकरराव प्रवेशत ।

तो देखिल जन समस्त । प्रेमळ भक्त स्वामींचे ॥२१॥

स्वामीनाम वदती वाचे । कीर्तन स्वामीचरित्रांचे ।

पूजन स्वामीचरणांचे । आराध्यदैवत स्वामीच ॥२२॥

तया नगरीच्या नरनारी । कामधंदा करिता घरी ।

स्वामीचरित्र परस्परी । प्रेमभावे सांगती ॥२३॥

कित्येक प्रातःस्नाने करोनी । पूजाद्रव्य घेवोनी ।

अर्पावया समर्थचरणी । जाती अति त्वरेने ॥२४॥

महाराष्ट्र भाषा उद्यान । पद्मकुसुमे निवडोन ।

शंकर विष्णु दोघेजण । स्वामीचरण पुजिती ॥२५॥

इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा परिसोत प्रेमळ भक्त । अष्टमोध्याय गोड हा ॥२६॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb