Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण-भोजने ।

स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥

दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती ।

बहुत लोक दर्शना येती । अक्कलकोट नगरात ॥२॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक ।

पारसी यवन भाविक । दर्शना येती धावोनी ॥३॥

यात्रेची गर्दी भारी । सदा आनंदमय नगरी ।

साधु संत ब्रह्मचारी । फकीर संन्यासी येती पै ॥४॥

किती वर्णावे महिमान । जेथे अवतरले परब्रह्म ।

ते नगरी वैकुंठधाम । प्रत्यक्ष भासू लागली ॥५॥

असो ऐशा नगरात । शंकरराव प्रवेशत ।

आनंदमय झाले चित्त । समाधान वाटले ॥६॥

यात्रेची झाली दाटी । कैशी होईल स्वामीभेटी ।

ही चिंता उपजली चित्ती । मग उपाय योजिला ॥७॥

जे होते स्वामीसेवक । त्यात सुंदराबाई मुख्य ।

स्वामीसेवा सकळिक । तिच्या हस्ते होतसे ॥८॥

तियेची घेऊनी गाठी । शंकरराव सांगती गोष्टी ।

करोनी द्याल स्वामीभेटी । तरी उपकार होतील ॥९॥

व्याधी दूर करावी म्हणोनी । विनंती कराल स्वामीचरणी ।

तरी आपणा लागोनी । द्रव्य काही देईन ॥१०॥

बाईसी द्रव्यलोभ पूर्ण । आनंदले तियेचे मन ।

म्हणे मी इतुके करीन । दोन सहस्त्र रुपये द्याल की ॥११॥

ते म्हणती बाईसी । इतुके कार्य जरी करिसी ।

तरी दहा सहस्त्र रुपयांसी । देईन सत्य वचन हे ॥१२॥

बाई विस्मित झाली अंतरी । ती म्हणे हे सत्य जरी ।

तरी उदक घेऊनी करी । संकल्प आपण सोडावा ॥१३॥

शंकरराव तैसे करिती । बाई आनंदली चित्ती ।

म्हणे मी प्रार्थुनिया स्वामीप्रती । कार्य आपुले करीन ॥१४॥

मग एके दिवशी यती । बैसले होते आनंदवृत्ति ।

शंकरराव दर्शन घेती । भाव चित्ती विशेष ॥१५॥

बाई स्वामींसी बोले वचन । हे गृहस्थ थोर कुलीन ।

परी पूर्वेकर्मे यालागून । ब्रह्मसमंध पीडितो ॥१६॥

तरी आता कृपा करोनी । मुक्त करावे व्याधीपासोनी ।

ऐसे ऐकता वरदानी । समर्थ तेथोनी उठले ॥१७॥

चालले गावाबाहेरी । आले शेखनुराचे दर्ग्यावरी ।

शंकररावही बरोबरी । त्या स्थळी पातले ॥१८॥

यवनस्मशानभूमीत । आले यतिराज त्वरीत ।

एका नूतन खाचेत । निजले छाटी टाकोनी ॥१९॥

सेवेकरी शंकररावासी । म्हणती लीला करून ऐसी ।

चुकविले तुमच्या मरणासी । निश्चय मानसी धरावा ॥२०॥

काही वेळ गेल्यावरी । उठली समर्थांची स्वारी ।

शेखनुराचे दर्ग्यावरी । येउनी पुढे चालले ॥२१॥

शंकररावे तया दिवशी । खाना दिधला फकिरांसी ।

आणि शेखनुरासी दर्ग्यासी । एक कफनी चढविली ॥२२॥

मग काही दिवस लोटत । स्वामीराज आज्ञापित ।

बारीक वाटूनी निंबपत्र । दहा मिरे त्यात घालावी ॥२३॥

ते घ्यावे हो औषध । तेणे जाईल ब्रह्मसमंध ।

जाहला स्वामीराज वैद्य । व्याधी पळे आपणची ॥२४॥

स्वामीवचनी धरुनी भाव । औषध घेती शंकरराव ।

तयासी आला अनुभव । दहा दिवस लोटले ॥२५॥

प्रकृतीसी आराम पडला । राव गेले स्वनगराला ।

काही मास लोटता तयाला । ब्रह्मसमंधे सोडिले ॥२६॥

मग पुन्हा आनंदेसी । दर्शना आले अक्कलकोटासी ।

घेउनी स्वामीदर्शनासी । आनंदित जाहले ॥२७॥

म्हणती व्याधी गेल्यानंतर । रुपये देईन दहा सहस्त्र ।

ऐसा केला निर्धार । त्याचे काय करावे ॥२८॥

महाराज आज्ञापिती । गावाबाहेर आहे मारुती ।

तेथे चुनेगच्ची निश्चिती । मठ तुम्ही बांधावा ॥२९॥

ऐशिया एकांत स्थानी । राहणार नाही कोणी ।

ऐसी विनंती स्वामीचरणी । कारभारी करिताती ॥३०॥

परि पुन्हा आज्ञा झाली । मठ बांधावा त्याच स्थळी ।

भुजंगादिक मंडळी । दाखविली जागा तयांनी ॥३१॥

सर्वानुमते तेथेचि । मठ बांधिला चुनेगच्ची ।

किर्ती शंकररावाची । अजरामर राहिली ॥३२॥

अगाध स्वामीचरित्र । तयाचा न लागेची पार ।

परी गंगोदक पवित्र । अल्प सेविता दोष जाती ॥३३॥

श्रवणी धरावा आदर । तेणे साधती इहपरत्र ।

जे झाले स्वामीकिंकर । विष्णू शंकर वंदिती त्या ॥३४॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा परिसोत भाविक भक्त । नवमोऽध्याय गोड हा ॥३५॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb